शेरे सोसायटीच्या अध्यक्षपदी आक्काताई निकम ; उपाध्यक्षपदी विकास निकम....निवडी बिनविरोध, स्थापनेनंतर पहिल्यांदाच महिलेस संधी

 शेरे सोसायटीच्या अध्यक्षपदी आक्काताई निकम ; उपाध्यक्षपदी विकास निकम....निवडी बिनविरोध, स्थापनेनंतर पहिल्यांदाच महिलेस संधी


कराड - शेरे (ता. कराड) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी श्रीमती आक्काताई जयसिंग निकम तर उपाध्यक्षपदी श्री. विकास रामराव निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्रीमती निकम यांना संस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच महिला अध्यक्ष बनण्याची संधी मिळाली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत या निवडी पार पडल्या. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. व्ही. आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.


नुकतीच सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये सत्ताधारी भीमाशंकर पॅनेलने विरोधी पॅनेलचा 12-1 ने पराभव केला. नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी श्री. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये श्रीमती निकम व श्री. निकम यांचे सदरच्या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाले. श्रीमती निकम यांच्या नावाची संचालक संभाजी आण्णा निकम यांनी सूचना मांडली. त्यास शंकर बाळासाहेब निकम यांनी अनुमोदन दिले. तर श्री. निकम यांच्या नावाची सतीश बाजीराव निकम यांनी सूचना मांडली. त्यास श्रीरंग नाथा निकम यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर श्री. मोरे यांनी निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सचिव धैर्यशील थोरात यांनी निवडीचे कामकाज पाहिले.


यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, कृष्णेचे माजी संचालक वसंतराव निकम, अशोकराव पाटील, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक संभाजीराव निकम, माजी सरपंच मोहनराव निकम, पैलवान राहुल निकम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिकराव निकम, माजी अध्यक्ष जयकर जाधव, सोसायटीचे माजी अध्यक्ष निवासराव निकम, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव गावडे, लालासाहेब पवार, डॉ. हर्षल निकम, कृष्णा कृषी उद्योग संघाचे संचालक संजय निकम, अरुण थोरात, युवराज चव्हाण, आण्णासाहेब खरात, शंकर मंडले, संभाजी पवार, जावेद शिकलगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


नूतन पदाधिकाऱ्यांचे कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, विध्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी अभिनंदन केले.


 


Popular posts
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image