विद्यार्थ्यांनी ज्ञानाधिष्ठित बनावे : प्रा. डॉ. अशोक शिंदे ‘जयवंत इंजिनिअरिंग’चा पदवी प्रदान सोहळा उत्साहात


विद्यार्थ्यांनी ज्ञानाधिष्ठित बनावे : प्रा. डॉ. अशोक शिंदे
‘जयवंत इंजिनिअरिंग’चा पदवी प्रदान सोहळा उत्साहात


कराड - विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड व क्षमता जाणून आपली ध्येये गाठण्यासाठी सखोल अभ्यास करावा. त्यामध्ये सातत्य ठेवावे. विद्यार्थ्यांनी संशोधनाला चालना देऊन ज्ञानाधिष्ठित बनावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी केले. किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथील जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटमध्ये प्रदवी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.


व्यासपीठावर शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, प्रमुख सल्लागार डॉ. विनोद बाबर, प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार व परीक्षा प्रमुख प्रा. सीमा पाटील उपस्थित होत्या.


प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना ते म्हणाले, उच्च शिक्षण व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती होत असताना नाविन्याच्या बाबतीत आपला देश खूप मागे आहे. संशोधनातील पेटंटच्या बाबतीतही चीन-अमेरिकेच्या तुलनेत आपण खूपच पिछाडीवर आहोत. संशोधन व नवनिर्मितीतून औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळत, असल्याने या बाबीला अधिक चालना देण्याची गरज आहे.


संजय पवार म्हणले, शिक्षणामध्ये संशोधन व रोजगाराभिमुख शिक्षणाला अधिक महत्व आहे. या संस्थेच्या माध्यमातून तसा प्रयत्न केला जात आहे.


प्राचार्य डॉ. यु. एस. सुतार यांनी स्वागत केले. प्रा. वर्षाराणी माने यांनी प्रास्तविक केले. प्रा. बाजीराव पाटील आभार मानले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागप्रमुख प्रा. झुंजार पाटील, प्रा. राजेंद्र पेठकर, प्रा. डॉ. श्रीपाद येलापुरे, प्रा. मनोज देशमुख आदींनी संयोजन केले.