जीवनावश्यक वस्तुंच्या घरपोच सुविधांसाठी खालील ॲपचा..वापर करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

 


जीवनावश्यक वस्तुंच्या घरपोच सुविधांसाठी खालील ॲपचा..वापर करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन


 सातारा : लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू (उदा. अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध, औषधे इ.) घरपोच मागविण्याबाबत खालील नमूद ई-कॉमर्स सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता घरपोच सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी   शेखर सिंह यांनी केले आहे.


          DMart Ready Application अव्हेन्यू सुपरमार्टस् लिमिटेड यांचे डी-मार्ट स्टोअर्स तर्फे प्ले स्टोअर वर डी मार्ट रेडी (DMart Ready) नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केलेले असून या अॅप्लिकेशन द्वारे सातारा व कराड शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणी नोंदवून वस्तू घरपोच मागविता येतील.  सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुप सातारा शहारातील नागरिकांसाठी मालगांव, ता.सातारा येथील सात्विक नॅचरल फार्मिग ग्रुपने ९७६६५५०५९१ या व्हॉटसअप मोबाईल नंबरवर ग्राहकांकड़न आवश्यक असणाऱ्या शेतमाल व भाजीपाल्याची मागणी नोंदवून शेतमाल घरपोच देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.Online Bhaji Application सातारा शहारातील नागरिकांसाठी प्ले स्टोअर वरील Online Bhaji Application नावाच्या मोबाईल अप्लिकेशन अॅपद्वारे नागरिकांना पालेभाज्या, फळे, सुका मेवा, दुग्धजन्य पदार्थ व मसाले या जीवनावश्यक वस्तूंची मागणी नोंदवून वस्तू घरपोच मागविता येतील. तर Needly Application आयटी सोल्यूशन्स प्रा.लि.पुणे यांनी लॉकडाऊन परिस्थितीचा विचार करुन संपूर्ण महाराष्ट्रभर "Needly" नावाचे ॲप विक्रेते आणि खरेदीदार यांच्यासाठी तयार केलेले असून हे अॅप सातारा जिल्हयातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायतीच्या नागरी भागात वापरण्यास सुरुवात केली आहे. "Needly" अॅपमध्ये वापरकर्त्यास त्याच्या जवळच्या सर्व दुकानांची, अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांची यादी मिळेल व त्यांना या लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच जीवनावश्यक वस्तू किराणा, भाजीपाला, फळे, दुध व औषधे मागवता येतील.


                जिल्हयातील शहरी भागामधील सर्व नगर नरिषद, नगर पंचायत कार्यालयांनी नागरिकांना घरपोच सेवा देण्याबाबत किराणा, भाजीपाला, फळे, दूध व औषधे विक्रेत्यांची व्हॉटसअॅप मोबाईल नंबरसह यादी प्रभाग निहाय प्रसिध्दी केलेली आहे. तरी शहरी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी संबंधित विक्रेत्यांना फोन करुन जीवनाश्यक वस्तू घरपोच मागवून घ्याव्यात व  विनाकारण घराबाहेर न पडण्याबाबत दक्षता घ्यावी.


                वरील प्रमाणे जीवनावश्यक उपाययोजनांचा नागरीकांनी लाभ घेऊन कोविड--१९ निर्बंध असेपर्यंत घराबाहेर पडू नये. तसेच किराणा, भाजीपाला, फळे व औषधे इत्यादीची खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे व  नियमाचे काटेकारपणे पालन करुन कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.