उपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह,  22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल


उपजिल्हा रुगणालय, कराड येथे दाखल अणाऱ्या पाच नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह,  22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 167 जणांना केले दाखल


सातारा  : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे उपचार सुरु असलेले  बाधित रुग्ण क्रमांक 17 चे  निकट सहवासित 3 आणि बाधित रुग्ण क्रमांक 29 चे निकट सहवासित 2  अशा एकूण   5 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तें  (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


 तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 14 असे एकूण 22 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. आज 28 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 73, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 80, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 9 असे एकूण 167 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.   या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.