3 वर्षाचा निकट सहवासित मुलगा कोरोना बाधित...ऑरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे ...कलम 144 मधून वृत्तपत्र घरपोच वाटपास सुट : जिल्हाधिकारी शेखर सिंह 


3 वर्षाचा निकट सहवासित मुलगा कोरोना बाधित...ऑरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे ...कलम 144 मधून वृत्तपत्र घरपोच वाटपास सुट : जिल्हाधिकारी शेखर सिंह 


सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 3 वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.


आता सातारा जिल्ह्यात 13 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


ऑरोग्य सेतू ॲप सर्वांनी वापरावे 



सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी भारत सरकारने विकसीत केलेले ऑरोग्य सेतू ॲप उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हे आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन जास्तीत जास्त ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.


कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता भारत सरकारने कोविड- १९ ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी अॅन्ड्रॉईड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी बहुभाषिक एकूण ११ भाषांमध्ये उपलब्ध असलेले आरोग्य सेतू अॅप विकसित केले आहे. या अॅपची सर्वसाधारण वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. हे अॅप ब्ल्युटुथ टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. याव्दारे कोविड- १९ बाधीत रुग्णांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. टेक्नॉलॉजीव्दारे कोविड बाधीत रुग्ण आसपास आल्यास (साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. या अॅप मध्ये कोविड- १९ बाधेची स्वः चाचणी सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे किंवा काय करु नये याबाबतची प्रमाणित माहिती वापरकर्त्यास मिळते. 


स्वः चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास या अॅपव्दारे जवळच्या कोविड तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करुन दिला जातो. अथवा तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत वापरकर्त्यास या अॅपव्दारे सुचविण्यात येते. या अॅप व्दारे कोविड- १९ बाधेच्या अनुषंगाने वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. तसेच, सर्व राज्यातील हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात. या ॲप व्दारे लॉक डाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासल्यास ई- पास व्दारे अर्ज करुन पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हे अॅप पुढीलप्रमाणे डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. 


आयओएस मोबाईल सिस्टीमसाठी: itms-apps://itunes.apple.com/app/id५०५८२५३५७ व
ॲण्रॉयओईड मोबाईल सिस्टीमसाठी: https://play.google.com/store/appes/details?id=nic.goi.arogyasetu
हे ॲप कोविड- १९ बाधित रुग्णांचे संकलित केलेल्या भ्रमणध्वनी वापरकर्त्याच्या कक्षेत आल्यानंतर धोक्याची सूचना देत असल्याने, आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रातील सर्व कोविड-१९ बाधित रुग्ण, संशयीत रुग्ण, विलगीकरण व अलगीकरण असलेल्या तसेच रुग्णालयातून उपचारअंती सोडून देण्यात आलेले सर्व नागरीकांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकलित करावे. 


तरी जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील तसेच महसुल, पोलीस, आरोग्य, नगर पंचायत, नगर परिषद इत्यादी विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी सदरचे अॅप डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी त्यांचे आधिकार क्षेत्रामध्ये कोविड- १९ बाधित रुग्ण, विलगीकरण कक्षातील सर्व रुग्ण, संस्थामध्ये अलगीकरण करण्यात आलेले सर्व संशयीत बाधित रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले बाधा मुक्त नागरीक तसेच, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांनाही जनहितार्थ हे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 


कलम 144 मधून वृत्तपत्र घरपोच वाटपास सुट


सातारा : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या आदेशाद्वारे सातारा जिल्ह्यात वृत्तपत्रांचे घरपोच वाटप करण्यास मनाई करण्यात आली होती. आता या आदेशामधून जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी वृत्तपत्र घरपोच वाटपा करण्यास सूट दिली आहे. या संबंधीचे आदेशही निर्गमित झाले आहेत.