4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 31विलगीकरण कक्षात दाखल


4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 31विलगीकरण कक्षात दाखल


 कराड - जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या चार अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच  श्वसन संस्थेचा तीव्र जंतु संसर्गामुळे 3 ते 55 वर्ष वयोटातील  6 नागरिकांना (3 पुरुष व 3 महिला), दिल्ली येथून प्रवास करुन आलेल्या 20 ते 46 वर्ष वयोगटातील तीन पुरुषांना, मुंबई येथून प्रवास करुन 23 ते 28 वर्ष वयोगटातील तीन पुरुष असे एकूण 12 अनुमानितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयस्तरावरील काविड कक्षामध्ये वाई 3, कोरेगाव येथे 8, कराड येथे 6 व  फलटण येथे 2 असे 19 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या सर्व 31  जणांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.