कराड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह तर 44 रिपोर्ट निगेटिव्ह, 72 जणांना केले दाखल

 


कराड येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह तर 44 रिपोर्ट निगेटिव्ह, 72 जणांना केले दाखल


सातारा : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल कोविड-19   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


आता सातारा जिल्ह्यात 34   कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 44  कोविड-19 बाधित  रुग्ण आढळले आहेत.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 44 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. 


आज दि.30 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 10, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 47, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 व कोरेगाव येथे 14 असे एकूण 72 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या  एका कोविड बाधित रुगणाचा 14 दिवसानंतर दुसरा नमुना असे एकूण 73 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image