कोरानाग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णा परिवाराकडून 50 लाखांचा मदतनिधी पी.एम. केअर फंडाकडे : डॉ. सुरेश भोसले 


कोरानाग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णा परिवाराकडून 50 लाखांचा मदतनिधी पी.एम. केअर फंडाकडे : डॉ. सुरेश भोसले 


कराड : देशभर झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी कराड येथील कृष्णा परिवार पुढे सरसावला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णा परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून पी.एम. केअर फंडाकडे लवकरच सुमारे 50 लाख रूपयांचा निधी सुपूर्द करणार असल्याचे कृष्णा परिवाराचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केले आहे.


कोरानाचा सामना करण्यासाठी कृष्णा परिवाराने पूर्वीपासूनच अनेक उपाययोजना केल्या आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना संशयित व बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी 110 बेडचे सुसज्ज असे स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी लहान मुले, महिला व पुरूष रूग्णांसाठी स्वतंत्र विभाग असून,  स्वतंत्र आयसीयु विभाग व व्हेंटिलेटरची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफ यामुळे कृष्णा रूग्णालयातील या विशेष वॉर्डमध्ये आज मोठ्या प्रमाणात संशयित रूग्णांना दाखल केले जात आहे. त्यांच्यावरील चाचण्यांसाठीही येथे दोन स्वतंत्र रोगनिदान प्रयोगशाळा असून, शासनाकडून परवानगी मिळाल्यास याचठिकाणी कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार आहे.


रूग्णसेवेबाबत सर्वोच्च सेवा पुरविणाऱ्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने शासनाच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 40 लाखांचा मदतनिधी जाहीर केला आहे. तसेच कृष्णा परिवारातील जयवंत शुगर्स साखर कारखान्यानेही 5 लाख 40 हजारांचा मदतनिधी जाहीर केला आहे. याचबरोबर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातूनही मदतनिधी जाहीर केला जाणार असून, या संस्थांच्या माध्यमातून एकूण सुमारे 50 लाख रूपयांचा मतदनिधी पी.एम. केअर फंडात सुपूर्त केला जाणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.


दरम्यान, कृष्णा कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मितीस प्रारंभ केला आहे. लवकरच ते कृष्णेच्या सर्व सभासदांना मोफत वितरित केले जाणार असून, बाजारातही उपलब्ध होणार असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image