मुंबई-पुणे येथून कोणी आले असल्यास प्रशासनास माहिती द्यावी : यशवंत डांगे...पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे; सर्वांनी व्यक्तिगत काळजी घ्यावी : डॉ. प्रकाश शिंदे 


मुंबई-पुणे येथून कोणी आले असल्यास प्रशासनास माहिती द्यावी : यशवंत डांगे...पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे; सर्वांनी व्यक्तिगत काळजी घ्यावी : डॉ. प्रकाश शिंदे 


कराड - काही अपवाद वगळता कराडकरानी प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यामुळे कोरोना व्हायरसला आपण हरवू शकतो. असा आत्मविश्वास कराडकरांमध्ये निर्माण झाला आहे. हे चित्र आशादायक असून यापुढील दोन आठवडे जागृत राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यानंतर आणि नव्याने गल्लीत परदेशातून तसेच मुंबई, पुणे येथून कोणी नागरिक आले असेल तर त्यांना काही दिवसासाठी वाघेरीला ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.


कराड नगरपालिका प्रशासनासह महसूल प्रशासन कराड शहरासह कराड तालुक्यातील नागरिकांच्यावर बारकाईने 
लक्ष ठेवताहेत. दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी सहा ते नऊ अशी वेळ दिले आहे. त्याचबरोबर अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत आहे. याला कराड शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळत असून दुसरा दिवसही लॉकडाऊन पूर्णपुणे कडकडीत पाळण्यात आला.


परदेशातून तसेच मुंबई, पुणे येथून 30 मार्चपर्यंत आलेल्या नागरिकांच्याकडून कोरोना संसर्ग होण्याची शक्यता मावळलेली आहे. दरम्यान कराड शहरात नव्याने पुणे, मुंबईहुन येणाऱ्या नागरिकांच्यावर सर्वांनीच लक्ष ठेवावे. कराड शहरात कोण नव्याने आले असतील तर प्रशासनाला तात्काळ कळवावे. असे आवाहनही मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.


कोरोना वायरस संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी अजून पुढील 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे. कराडमधील उपजिल्हा रुग्णालय येथे आजपासून covid 19 चे नमुने घेण्याची सुविधा उपलब्द करण्यात आलेली आहे. ताप, खोकला,सर्दी याचा कोणास त्रास होत असल्यास आणि वयोवृद्ध लोकांची टेस्टिंग करावयाची असल्यास उपजिल्हा रुग्णालय कराड येथे सोय करण्यात आले आहे. दरम्यान या पुढच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणीही हलगर्जीपणा करू नये. "कोरोना"संबंधाने अथवा कोरोनाच्या लक्षणाच्या दृष्टीने कसलाही त्रास होत असल्यास टेस्टिंगसाठी स्वतःहून पुढे यावे. कारण आता यापुढील 15 दिवस सर्वांनी काळजी घ्यावी अशी माहिती वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे यांनी सांगितले.


त्रास होत असल्यास उपचारासाठी दाखल व्हावे : डॉ. प्रकाश शिंदे 


11 एप्रिल नंतर मुंबई व पुणे येथुन कराड शहरात आलेल्या लोकांनी प्रशासनाशी संपर्क साधून कोरोनाच्या अनुषंगाने कोणताही त्रास होत नाही. अथवा काही त्रास होत असल्यास प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश शिंदे यांनी केले आहे


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती