सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 


सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 


कराड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नागरिक अतिशय योग्य रितीने लॉकडॉऊनला प्रतिसाद देत आहेत. कराड शहरातील नागरिकांनीही चांगला लॉकडॉऊन मध्ये सहभाग घेतला. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये.शासनाच्या व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहेत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये लोकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थीतीचा आढावा पालकमंत्री नामदर बाळासाहेब पाटील यांनी घेतला.जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी रविवारी कराड शहरात ठीकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यावेळी उपस्थित होते.


सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा घाट या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर नागरिक, किराणा दुकानदार यांच्याकडूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाबत माहिती घेतली. आझाद चौक ते चावडी चौक दरम्यान पायी चालत पाहणी केली. दरम्यान रविवार पेठ येथील डॉ. अनिल शाह यांच्या शाह हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. जनतेने लॉक डाऊनला चांगला प्रतिसाद दिला असून यापुढेही प्रशासनास सहकार्य करावे. कोणीही अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये. कारण कोरोनाला रोखायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.