70 वर्षे मॄत महिलेचा अहवाल निगेटिव्ह .... 36 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह...... 3 नागरिक दाखल तर 1 रुग्णावर आणखी 5 दिवस उपचार


70 वर्षे मॄत महिलेचा अहवाल निगेटिव्ह .... 36 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह...... 3 नागरिक दाखल तर 1 रुग्णावर आणखी 5 दिवस उपचार


कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 22, उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथील प्रत्येकी 1 असे एकूण 36 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे काल मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


  काल 20 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 3 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल Inconclusive असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुनर्तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे    डॉ.  गडीकर यांनी कळविले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image
6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला.... अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
Image