पायी जाणाऱ्या नागरिकांचे आटके टप्पा येथे राहण्याची सुविधा... नागरिकांना सहकार्य व मदत करावी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना


पायी जाणाऱ्या नागरिकांचे आटके टप्पा येथे राहण्याची सुविधा... नागरिकांना सहकार्य व मदत करावी, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना


कराड - कोरोना वायरस संदर्भात केंद्र व राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत दरम्यान परराज्यातून महाराष्ट्रात असलेले कामगार सध्या पायी जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत त्यांना आहे त्या ठिकाणी राहण्याची खाण्याची व्यवस्था राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या दृष्टीने सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.


परराज्यातील व परजिल्ह्यातील रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांसाठी आटके टप्पा (ता. कराड) येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. पायी जाणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांना जी मदत करता येईल ती प्रशासनाच्यावतीने कराव्यात. अशा सूचनाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्याने हातावर पोट असलेले कामा धांदयानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आलेले परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील आलेले लोक संचारबंदीमुळे अडकून राहिले आहेत, या लोकांनी आपल्या गावी जाण्यासाठी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून जाणाऱ्या अशा फिरस्त लोकांची राहण्याची व जेवणाची सोय कराड तालुक्यातील आटके टप्पा येथील विराज मंगल कार्यालायात महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.


या लोकांच्या आरोग्यासंदर्भात घेतल्या जात असलेल्या सोयी सुविधांची पाहणी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, अटकेचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.