ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती


सातारा : कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी संचारबंदीच्या काळात हालचाल न करु शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना सुविधा पुरविणे व मदत करण्याच्या अनुषंगाने नोडल अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सातारा यांनी नियुक्ती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नियुक्ती केली आहे.


जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांगांना संचारबंदीच्या काळात सुविधा पुरविणे तसेच मदतीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांचा  दुरध्वनी क्र. 02162-298106, जिल्हा आपत्ती व्यवस्था समिती यांचा दूरध्वनी क्र. 02162-232349 येथे संपर्क साधावा तसेच टोल फ्री क्र. 1077 या दूरध्वनीवरही संपर्क साधावा असे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनी कळविले आहे.