गोरगरीब जनतेला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप


गोरगरीब जनतेला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप


कराड - गोरगरीब जनतेला संचारबंदीचा त्रास होऊ नये. यासाठी विविध संघटनांच्या मार्फत धान्य वाटप व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच रहिमतपूर येथील विविध संघटनांच्या वतीने सहकार मंत्री तथा पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गोरगरीब जनतेला धान्य वाटप करण्यात आले.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे अत्यावश्यक सुविधांचा तुटवडा होऊ नये म्हणून भाजी मार्केट चालू ठेवले जात असून रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथील भाजी मार्केटची मांडणी दुपारी १ ते ४ या वेळेत सुरक्षित अंतर ठेऊन केली असल्याची पाहणी केली.


येथील जैन समाजाच्या वतीने गोरगरीब जनतेच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या स्थळाची देखील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली. याप्रसंगी, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, रहिमतपूर नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर, नंदकुमार पाटील, डॉ.अशोक गांधी, अविनाश माने, वासुदेव माने, विद्याधर बाजरे, संजय माने, धैर्यशील सुपने, सचिन बेलागडे आदी उपस्थित होते.