शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक रिलायन्स फाउंडेशन गरीब सोबत राहण्याचा सामाजिक उपक्रम

 


शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक रिलायन्स फाउंडेशन गरीब सोबत राहण्याचा सामाजिक उपक्रम


 ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांना  कोरोना  परिस्थितीत P.M.गरीब कल्याण  योजना  बाबत समस्यांची सोडवणूक रिलायन्स फाऊंडेशन गरिबा सोबत राहण्याचा सामाजिक उपक्मात तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील यशदाचे  मास्टर ट्रेनर  विद्याधर गायकवाड यांनी  साधला सुसंवाद 


सामाजिक सेवेचे भान ठेऊन रिलायन्स फाऊंडेशन श्रीमती नीता अंबानी यांच्या समाज बदलाच्या आणि ग्रामीण विकासाचा पाया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बळकट करण्याचा मानस ही संकल्पना मनात ठेऊन कार्यरत आहे. ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, शहरी विकास आणि संस्कृतीचे जतन या विविध विषयावर अखंडपणे निस्वार्थी भूमिकेने काम करत आहे. या कामाचाच एक भाग म्हणून रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा सातारा जिल्ह्यात १ जुन २०१६ पासून कार्यरत आहे. कोरोना आणीबाणीच्या काळात बँकिंग व्यवहार व ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना घर बसल्या माहिती होण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा सातारा यांच्या वतीने कॉल कॉन्फरन्सच्या माध्यमातून घरबसल्या शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाय योजनांची या तीन महिण्यातील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या ऑडियो कॉल कॉन्फरन्समध्ये एका वेळी ३० शेतकऱ्यांचा सहभाग होता. ही कॉल कॉन्फरन्स नुकत्याच दोन कॉन्फरन्स झाल्या. सायंकाळी ६: ३० ते ७:३० च्या दरम्यान जवळ जवळ १ तास चालू होती. या कॉल कॉन्फरन्सला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.


 या कॉल कॉन्फरन्सला तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे येथील यशदाचे मास्टर ट्रेनर  विद्याधर गायकवाड  व सचिन मताले कृषी विषय तज्ञ रिलायन्स फाउंडेशन यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून  सुसंवाद  साधून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी  कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कॉल कॉन्फरन्स दरम्यान १) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना काय आहे ? २) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभार्थी कोण होऊ शकतो?


३) प्रधानमंत्री योजनेसाठी कोणत्या बँकेत खाते असणे गरजेचे आहे? ४) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी जन धन खाते असणे गरजेचे आहे का? ५) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये सर्व महिलाना लाभ मिळणार आहे का? ६) उज्ज्वला योजनेमध्ये सिलेंडर मोफत मिळणार आहे का? ७) उज्ज्वला योजनेमधून किती सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे? ८) सिलेंडर मोफत  भरून मिळणार की अनुदान खात्यावरती जमा होणार आहे? ९) जन धन योजनेची माहिती हवी आहे? १०) उज्ज्वला योजंनेमधून सिलेंडर नसेल तर अनुदान मिळणार आहे का? ११) आईच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री कल्याण योजनेतील रक्कम जमा झालेली नाही आहे यासाठी काय करावे? १२) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कधी पर्यन्त आहे ? १३) उज्जवला योजनेमधून मोफत सिलेंडर कधी पासून मिळणार आहे? १४) उज्जवला योजनेचा कोणत्या भागातील लोकांना होणार आहे ? १५) जन धन खाते कोणत्या बँकेत काढावे लागते? १६) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी कोणत्या अटी आहेत? १७) जन धन योजनेमध्ये व्याज किती टक्के मिळते? 18)लॉक डाउनच्या काळात ATM किती वेळ चालू राहणार. बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँक मित्र &बँक सखी कशा पद्धतीत ग्रामीण भागात काम करतात. BCS ग्रामीण भागात लोकांना कमी वेळात घराच्या जवळ पैसे उपलब्ध करून देत आहेत. बँकेत पैशाची देवाण घेवाण करताना कशी काळजी घ्यायला पाहिजे कोरोनो काळात लोकांनी स्वतःची काळजी कशी घेतली  पाहिजे त्यावर सुद्धा त्यांनी सोप्या शब्ददात उदाहरना सह समजावून सांगितले  अशा  पद्द्तीचे शेतकऱ्यांनी कॉल कॉन्फरन्स दरम्यान प्रश्न विचारली व शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत  यशदाचे मास्टर ट्रेनर विद्याधर गायकवाड यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या समस्यांची सोडवणूक करून शेतकऱ्यांना योग्य अशे मार्गदर्शन केले.


       या  ऑडिओ कॉन्फरन्समध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील 60 शेतकऱ्याने विविध प्रश्न विचारून आपला सहभाग घेतला तर त्यांच्यासोबत असलेले इतर शेतकऱ्यांनी हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम ऐकून या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला . त्यांच्या समस्यांची सोडवणूक केली गेली. या कॉन्फरन्समध्ये


रिलायन्स फाउंडेशन चे मारुती खडके व निवास निकम  यांचा सहभाग होता.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पोलंड येथे राहणाऱ्या आपल्या राज्यातील वनसगांवचे वैभव शिंदे यांनी लिहीलेली ही पोस्ट... मुद्दाम आपणा सर्वांसाठी वाचा आणि सगळ्यांना सांगा.... जीवन सुंदर आहे दक्षता घेऊ या...!
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
48 तासात बँकेत जमा झाली रक्कम.....शेतकऱ्यांना चैतन्य देणारी कर्जमुक्ती