सातारा मुस्लिम जमातीतर्फे मदरसा दारूल उलम मेहमुदिया येथे विलगीकरण कक्ष सुरू करावा


सातारा मुस्लिम जमातीतर्फे मदरसा दारूल उलम मेहमुदिया येथे विलगीकरण कक्ष सुरू करावा


सातारा - कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे .कोरोणाच्या विरोधात संपूर्ण देश लढत आहे .कोरोना विरोधात लढाई मध्ये शासनाच्या आदेशाचे पालन करणे ही आत्ताच्या घडीला सर्वात मोठी देशसेवा आहे. देशातील सर्व घटक कोरोनाच्या विरोधात लढून कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत . 


कोरोनाच्या विरोधात लढाईमध्ये सामील होणे ही आत्ता देशसेवा आहे . सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते व शल्य चिकित्सक आमोद गडीकर निकराने लढा देत आहेत. सातारा आपत्तीकालीन समितीला साथ देणे आपले कर्तव्य आहे असा निर्धार करत सातारा जिल्हा मुस्लिम जमातीने अमीर सहाब यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेल्या दारूल उलूम मेहमुदिया मध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली आहे . 


साताऱ्यातील विलगिकरण कक्ष हे सातारा शहरापासून दूर आहेत ज्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर सुद्धा ताण येत असतो . त्यामुळे सातारा शहरातील लगत असणाऱ्या दारूल उलूम मेहमुदिया मध्ये विलगिकरण कक्ष सुरू केल्यास कर्मच्यांच्यावरील ताण कमी होईल संस्थेला देश सेवेची संधी मिळेल त्यामुळे ह्या मागणीला मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती सादिकभाई शेख ,फिरोज पठाण , शकील शेख यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे.