काय परिस्थिती आहे, मदत लागली तर सांगा...माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी असा साधला सरपंचांशी संवाद


काय परिस्थिती आहे, मदत लागली तर सांगा...माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी असा साधला सरपंचांशी संवाद


कराड - देशभरात तसेच राज्यात कोरोंना ग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून संवाद साधत गावातील सद्य परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शासनाने ज्या समित्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात केल्या आहेत. त्या समितीबाबतीत कश्या पद्धतीने कामकाज सुरू आहे. याचीही माहिती घेतली. 


याचसोबत शासनाच्या ज्या योजना सदया सुरू आहेत त्याबद्दल सरपंचांना माहिती दिली, की गावात ज्या लोकांकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहे अश्या लोकांना 5 किलो राशन मोफत मिळणार आहे. तसेच उज्वला योजनेमार्फत 3 महिन्यात 3 गॅसच्या टाक्या मोफत मिळणार आहेत. अश्या काही शासकीय योजनांची माहिती आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिली. गावातील लोकांना या योजनांचा फायदा व्हावा. यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोरोना बद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायती कडून विविध उपक्रम राबविले जावेत अश्याही सूचना आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिल्या व कोणतीही गावात अडचण आल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 


आ. पृथ्वीराज चव्हाण सद्य परिस्थिति बद्दल राज्यातील सचिवांसोबत रोज बोलून राज्याचा आढावा घेत आहेत. तसेच त्यांना उपयुक्त अश्या सूचना सुद्धा देत आहेत. याचसोबत आ. चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी यांच्याशी सुद्धा वेळोवेळी फोनवरून संवाद साधत चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याच संवादाचा भाग म्हणून आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सर्व सरपंचांशी फोनवरून संवाद साधला, या सरपंचांच्या संवादाला सर्वच सरपंचांनी उत्साहाने प्रतिसाद देत बाबांशी बोलताना या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले


 


Popular posts
सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 
Image
‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा
Image
मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हद्दीवर रोखलेला कोरोना अखेर कराडमध्ये दाखल झाला....वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांच्यावर कारवाई करावी...कोविड कक्ष उपजिल्हा रुग्णालयाऐवजी सह्याद्री हॉस्पिटलला हलवण्याची मागणी
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज...सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image