महाबळेश्वर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक लाख

महाबळेश्वर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक लाख


सातारा : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी महाबळेश्वर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने  मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाखाची मदत केली असून एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सपूर्द करण्यात आला आहे.


जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या आणि सातारा जिल्ह्याचे वैभव असलेले महाबळेश्वर येथील गडकिल्ले, विविध स्थळांचे, वनसंपदेचे रक्षण करणे हे प्रथम कर्तव्य माननाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला नेहमीच सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. या जाणीवेतून संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व वन विभागामार्फत एक लाख रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सपूर्द केला.