सिद्धांत जगताप यांनी मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ११,००० चा धनादेश मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केला सुपूर्द


सिद्धांत जगताप यांनी मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ११,००० चा धनादेश मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केला सुपूर्द


कराड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करत आहे. तसेच मुखमंत्री सह्यायत्ता निधीसाठी विविध संस्था व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे. त्यानुसार श्री जयंत भीमराव जगताप यांनी त्यांचे चिरंजीव सिद्धांत जयंत जगताप यांचा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ११,००० रुपयेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील निवासस्थानी मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कडे सुपूर्द केला.