केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार: पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते


केशकर्तनालय व्यवसाय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार: पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते


सातारा : संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.


कोरोना विर्षाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत.  यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने या काळात कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तु वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार केशकर्तनालय सुरू करणेस बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केलेस संबंधीतावर भारतीय दंड सहिंता चे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करणेत येईल.  कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तिच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबधीत व्यक्तीस तसेच  केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एका पत्रकान्वये अधिकराव लक्ष्मणराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांना कळविले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image