डॉ दिलीप सोलंकी यांचा माणुकीचा धर्म प्रेरणादायी
खरंच आज मी प्रत्यक्ष देव पाहिला. त्याचे असे झाले आज सायंकाळी चार वाजता उंब्रज येथे प्रचंड वादळ, वारा, वीज गडगड करीत होती. सर्विस रस्त्याच्या मधोमध एक 65 वर्षाची व्यक्ती रस्त्यात पडलेली होती. मोठमोठ्यानी ओरडत होते. पण तिथून येणार्या - जाणारी सगळे पाहत होते. कोणीही मदत केली नाही. तेवढ्यात एक पांढरी कार सातारावरून कराडला सर्विस रोडवरून आलेली "त्या" व्यक्तीजवळ थांबली व त्यातून "ती" व्यक्ती उतरली. पडलेल्या माणसाला विचारले बाबा काय झाले ? ते बाबा म्हणले, मी पडलोय, माझेही काहीतरी मोडलेला आहे. असे मला वाटते. ते देवदूतासारखे धावून आलेले म्हणले, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः डॉक्टर आहे. मी बघतो. त्यांनी विलंब न लावता त्या व्यक्तीचा पाय पहिला, मांडीत फॅक्चर होता, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी त्या बाबाला उचलले, बाजूला घेतले, आपल्या जवळच्या गोळ्या दिल्या, त्यांची विचारपूस केली. कोणत्या डॉक्टरकडे त्वरीत नेहता येईल, याचा सल्ला दिला. तोपर्यंत आम्हाला त्यांच्या घरच्यांना फोन करायला सांगितले. त्यांचे घरचे लोक आले. त्या बाबांना कराडला हाडांच्या दवाखान्यात घेऊन गेले. तोपर्यंत एवढा वेळ स्वतः तिथे डॉक्टर जातीने हजर राहून त्यांनी काम पूर्ण केले. हे डॉक्टर जर तिथे आले नसते तर सदर व्यक्तीचा ओरडून-ओरडून नक्कीच जीव गेला असता. देव रूपाने डॉक्टर दिलीप सोळंकी तिथे आले. त्यांनी डॉक्टर पेशाचा आब राखला. वयोवृद्धाचे पायाचे हाड मोडलेल्या व्यक्तीला सही सलामत हॉस्पिटलमध्ये पोहचवून महत्वपूर्ण काम केलज. डॉ दिलीप सोलंकी यानी केलेले मदत याला अनेकांनी सलाम केला आहे.
माणुसकी पहिली : संदीप कोटणीस
कराडची माणुसकीची माणुसकी आज मी खऱ्या अर्थाने पहिली. झाले असे की, उंब्रज येथील मेडिकल कॅम्प संपवून मी , डॉ. सोळंकी आणि मुकुंद सोहनी परत कराडला यायला निघालो. उंब्रजच्या वेशीवर पोहोचतो तोवर आमच्या समोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यावर आडवे पडले होते. वेदनांनी कळवळत होते.
डॉ. सोळंकी लगेच गाडीतुन खाली उतरले आणि त्या ग्रहस्थांची चौकशी करू लागले. त्यांना व्यवस्थित तपासले. बिचाऱ्यांचे खुब्याचे हाड मोडले होते. लगेच अँबुलन्सला फोन लावला आणि उंब्रजला त्वरित येण्याचे निर्देश दिले. आधी त्या गृहस्थाला उचलून रस्त्याच्या बाजूला आडोशाला घेतले. पेशंटच्या वेदना कमी होण्यासाठी स्वतःकडची औषधे दिली. तोवर त्या पेशंटचा मुलगा तिथे पोहोचला. त्याला सगळी परिस्थिती डॉक्टरांनी समजावली. काय नेमके करायचे ह्याचे मार्गदर्शन दिले आणि स्वतःचा नंबर देखील दिला. कोणतीही अडचण असल्यास मला फोन करा, हे बजावून सांगितले.
सध्या जेव्हा कोरोनाच्या भीतीपोटी लोक एकमेकांशी बोलणे देखील टाळतायत. तिथे डॉक्टरांनी त्या माणसाला नुसते तपासले नाही. तर त्याला इतका आधार दिला की, जणू ते डॉक्टरांचेच वडील आहेत.
माणुसकीचा ह्यापेक्षा मोठा संदेश आणखी काय असू शकतो ? माझ्या ह्या मित्राला माझा सादर प्रणाम...
संदीप कोटणीस
कराड