कराड मर्चंट समूहाकडून कडून मदतीचा हात..... धनादेश पालकमंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे सुपूर्द-


कराड मर्चंट समूहाकडून कडून मदतीचा हात..... धनादेश पालकमंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे सुपूर्द-


कराड - कोरोना कोविड - 19 व्हायरसमुळे आलेल्या महामारीत सम्पूर्ण भारत देशात व प्रामुख्याने *महाराष्ट्रात* आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाली आहे.यातून सावरण्यासाठी मर्चंट ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे.नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मर्चंट ग्रुपच्या वतीने मर्चंट ग्रुपचे चेअरमन सत्यनारायण मणियार* यांचा मार्गदर्शनाखाली कराड मर्चंट क्रेडीट को - ऑप संस्था,महिला मर्चंट,मर्चंट प्रतिष्ठान,मर्चंट स्वयंरोजगार,सुजीवन योग उपचार केंद्र यांचे मार्फत आज रविवार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुमारे दोन लाख बावीस हजार रुपयांचा निधीचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे सुपूर्द केला.


यावेळी मा.श्री.माणिकराव पाटील* (संचालक - कराड मर्चंट क्रेडीट को- ऑप संस्था),मा.श्री.किशोर झाड (व्यवस्थापक,मर्चंट क्रेडीट संस्था),मा.श्री.पी.एस यादव (व्यवस्था पक महिला मर्चंट)हे उपस्थित होते.


कराड मर्चंट संस्थेचा वतीने वेळोवेळी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन माणुसकी जपली आहे.राज्यात काही दिवसांपूर्वी आलेला महापूर असो किंवा इतर कोणतेही नैसर्गिक संकट असो किंवा शालेय मदत असो कराड मर्चंट तेथे स्वतः जातीने लक्ष घालून मदतीचा हात देत असते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image