कराडमध्ये एका घरात एकत्रित नमाजपठण...
प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याने न्यायालयाने ठोठावला दंड
कराड - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासानाकडून प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. मुस्लिम समाजाच्या सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन नमाज पठण करू नये असे आवाहन केले होते. दरम्यान आज शुक्रवार असल्यामुळे मंगळवार पेठेत एकत्रीत नमाज पठण करणारे 23 जणांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवार पेठेतील एका घरात नमाज पठण सुरू हाेते. यावेळी पोलिसांनी छापा टाकला आणि एकत्रित नमाज पठण करील असल्यामुळे सर्वांना ताब्यात कारवाई केली आहे.
पाेलिसांनी 23 पैकी 12 जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैदेची शिक्षा असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. उर्वरीत 11जण अल्पवयीन असल्याने त्यांना समज देवून सोडण्यात आले अशी माहिती पाेलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.
दरम्यान सातारा जिल्ह्याचे तबलिक समाजाचे अमीर अनिस तांबोळी, कराड विभागाचे मुस्लिम समाजाचे तबलीक समाजाचे अमीर युसूफ पटेल यांनी घरीच नमाज अदा करावी असे सांगितले होते. आणि मुस्लीम समाजाला आवाहन करण्यात आले हाेते. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज अदा करावी. मशिदीमध्ये प्रशासनाने नेमून दिलेल्या तीन ते चार व्यक्तीच राहतील अशी माहिती दिली होती.तरीदेखील कराडमध्ये एकत्रित नमाज पठण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कारवाई केली आहे.