हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा


हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा


कराड - महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार बाळासाहेब पाटील यांनी   शासकीय विश्रामगृह सातारा येथे  हणबरवाडी व धनगरवाडी उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक घेतली.


हणबरवाडी उपसा सिंचन योजनेच्या पाईप लाईनचे काम सद्यस्थितीत चालू आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे डोंगराकडील क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत असलेने त्याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच किवळ व खोडजाईवाडी तलावामध्ये कशा प्रकारे पाणी देता येईल याबाबत कार्यक्षेत्रावर पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याचा सूचना दिल्या.


हणाबरवाडी व धनगरवाडी उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होतील व योजना कार्यान्वित करणेबाबत येणाऱ्या अडीअडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा झाली.सदरच्या योजना कार्यान्वित करणेसाठी निधीची कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही त्यामुळे काम गुणावत्तपुर्वक  व गतीने पूर्ण करणेच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. हणबरवाडी उपसा सिंचन योजना व धनगरवाडी उपसा सिंचन योजना यांचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित करणेचे नियोजन असलेचे अधीक्षक अभियंता यांनी सांगितले.


यावेळी श्री.बा. रं. पवार, अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे प्रकल्प महामंडळ, श्री.श.श.गायकवाड, कार्यकारी अभियंता, कण्हेर कळावे विभाग क्र.२, करवडी व सुनील माने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इ.उपस्थित होते.


 


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश