कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा...बाजार समितीने भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवावा पणन मंत्र्यांच्या सूचना


मुंबई, - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई आणि पुणे बाजार समितीच्या आवारात निर्जंतुकीकरण करून, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. त्याच धर्तीवर इतर बाजार समितीने सुद्धा आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून अन्नधान्य, भाजीपाला,फळे यांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा आशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी  दिल्या. राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेंच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची सहकार मत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. 


श्री. पाटील म्हणाले, बाजार समिती कामकाज सुरू ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कामकाज सुरू ठेवावे. बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सॅनिटायझरचाही  वापर करावा.
शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून निघाल्यापासून ते बाजार समिती मध्ये येईपर्यत आवश्यक ती जबाबदारी घ्यावी, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास होता काम नये, याची सर्व जबाबदारी बाजार समितीने घ्यावी, असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले. 


 सहकार व पणन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कोरोना या आपत्कालीन परस्थितीमध्ये  मानवतेच्या दृष्टीने सहकार्य  करणे आवश्यक असून कोणीही मुख्यालय सोडू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.


सर्व विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक आणि  सहाय्यक निबंधक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना संपर्क साधून त्यांना शेतकरी उत्पादक गट उत्पादक कंपन्यांमार्फत थेट फळे आणि भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न कारावे त्यामुळे  ग्राहक घराबाहेर येणार नाहीत आणि गर्दीही होणार नाही. असेहीश्री. पाटील यांनी यावेळी संगितले. 


सद्यस्थितीत सांगली बाजारसमितीमध्ये हळदीचे सौदे बंद असून हे पूर्वरत करण्यासाठी धुळे बाजारसमितीने जी टोकन पद्धत राबवली आहेत त्या धरतीवर त्वरित कामकाज सुरू करण्यात यावे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांनी कृषी विभागाशी समन्वय ठेऊन कामकाज करावे आशा सूचनाही यावेळी केल्या.
बैठकीस सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन संचालक सुनील पवार, मुबई बाजार समितीचे प्रशासक अनिल चव्हाण, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, पुणे बाजार समितीचे प्रशासक  बी.जे. देशमुख, उपसंचालक श्री. टीकोळे,सरव्यवस्थापक दीपक शिंदे, सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील, विशेष कार्य अधिकारी अविनाश देशपांडे संबंधित अधिकारी उपस्थित होते.