खाजगी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी : सागर साळुंखे


खाजगी डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी : सागर साळुंखे


कराड - एकीकडे महाराष्ट्रासह देशात किंबहुना जगात न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे एकच धुमाकूळ घातला असताना राज्यासह देशात सगळीकडे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी लॉक डाउन करीत शासकीय डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ, मेडिकल दुकानदार,पोलीस महासंचालकसह राज्यातील सर्व पोलीस, पत्रकार, किराणा दुकानदार , दूध पुरवठा करणारे कळत नकळत देश सेवा करणारी सर्व मंडळी एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. असे असताना खाजगी डॉक्टर मात्र लपून बसलेले दिसत आहे. असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना छावा क्रांतिवीर सेना कराड तालुका अध्यक्ष सागर भारत साळुंखे यांनी मेल द्वारे पाठवली आहे.


ज्यांना डॉक्टर ही पदवी प्रदान करत असताना रुग्णसेवा ही प्रामाणिक व निष्ठेने करण्याची शपथ दिली जाते. आज तेच डॉक्टर आपापले खाजगी दवाखाने, क्लीनिक बंद करून लपून बसलेत हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत सर्व खाजगी डॉक्टरांना आपापली क्लीनिक, दवाखाने उघडे ठेवायला सांगितले असताना किंबहुना आवाहन केले असताना मात्र त्यांचा या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 


फक्त कोरोना व्हायरसचेच रुग्ण नसून इतर आजारांचे व नियमित आजारांची पेशंट आज आपल्या राज्यात व देशात आहेत. त्यांना आज हे खाजगी दवाखाने बंद असल्याने खूप त्रास भोगावा लागत आहे. याला जबाबदार कोण ?
खऱ्या अर्थाने आज देशसेवा करण्याची वेळ आली असताना हे डॉक्टर गायब आहेत. याचाच अर्थ त्यांना फक्त स्वार्थी व्यवसाय करायचा आहे. सेवा नाही. त्यांची पदवी का काडून घेऊ नये. हे मायबाप सरकारने ठरवावे. आज ह्या डॉक्टरांची देशाला गरज असताना ते उपलब्ध नाहीत त्यांच्यावर कडक व तातडीने कारवाई सरकारने करावी अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.