पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा शहरातील उपाययोजनांची केली पहाणी
कराड - राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा शहरातील उपाययोजनांची केली पहाणी केली.
कोरोना(कोविड १९) या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे, या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी सातारा शहरास भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. येथील पोवई नाका, राजवाडा व एस टी स्टँड चौक आदी. ठिकाणची पाहणी केली व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक आणासाहेब मांजरे , तहसीलदार आशा होळकर, वाहतूक सपोनि शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासमवेत सातारा शहर व जिल्हयातील एकूण परिस्थिती व अडीअडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.
कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळावे.
आरोग्य यंत्रणा संपूर्ण शहराचा होम टू होम सर्व्हे करीत आहे. प्रशासन सतर्क आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.