लिबर्टी मजदूर मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी...मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख
कराड : क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या लिबर्टी मजदूर मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रक्रमावर राहिली आहे. लिबर्टी मजदूर मंडळाच्यावतीने लिबर्टी व्यायामशाळेच्या उत्पन्नातील एक लाख रुपये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत याबाबतचा धनादेश सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी सुपूर्द केला.
यावेळी अँड. मानसिंगराव पाटील, मंडळाचे सचिव रमेश जाधव, सदस्य सचिन पाटील उपस्थित होते.लिबर्टी मजदूर मंडळाने नेहमी कराडच्या क्रीडाक्षेत्रबरोबर सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच दृष्टिकोनातून सध्या कोरोना महासंकट असल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी दिली.
लिबर्टी मजदूर मंडळ कबड्डीसह विविध मैदानी व मर्दानी खेळात अग्रेसर आहे. "लिबर्टी" ने कराड शहरातील क्रीडा चळवळीला चालना देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केले आहे. आजपर्यंतच्या विविध राष्ट्रीय आपत्तीत लिबर्टी मजदूर मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. "लिबर्टी" मंडळाची व्यायामशाळा असून या व्यायामशाळेचे चार महिन्याचे उत्पन्न कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.