आज सकाळी आणखी 2 रुग्ण सापडले

आज सकाळी आणखी 2 रुग्ण सापडले


कराड : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या काही केल्या कमी होईना. तर दररोज यामध्ये वाढ होत आहे. आज सकाळी आणखी 2 जत कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरेगाव येथील पुण्यावरून आलेला 36 वर्षीय तरुण आणि मूळ महाबळेश्वर रहिवाशी मुंबईवरून आलेला 23 वर्षीय विद्यार्थी दोघेही कोरोना बाधित आढळले आहेत. 


सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या कराड तालुक्यात आहे. ही संख्या काही केल्या कमी होईना. तसेच कोरोना बाधित रुग्णांची असणारी साखळीचा शोध लावून तोडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मायक्रो नियोजन करण्यात आले आहे.पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी कराडला भेट देऊन प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.