कोरोना रुग्णांसाठी 2 स्कूल बस आणि एक ॲम्बुलन्स सज्ज... आता रुग्णांची होणार नाही गैरसोय


कोरोना रुग्णांसाठी 2 स्कूल बस आणि एक ॲम्बुलन्स सज्ज... आता रुग्णांची होणार नाही गैरसोय


कराड : कोरोना रुग्णाला काल मंगळवार पेठ येथून चालत वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर नगरपालिका प्रशासन संवेदनशीलतेने जागे झाले आहे. तात्काळ नगरपालिका शाळा क्रमांक 3 मधील 2 वाहने सुसज्ज करण्यात आली आहेत. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पोपटराव साळुंखे यांनीही नगरपालिकेकडे एक ॲम्बुलन्स दिली आहे. कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये संसर्ग होणाऱ्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी वाहन उपलब्ध करून दिले आहेत.


कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 3 च्या 2 स्कूल बस मुख्याधिकारी यशवंत डांगे याच्याकडे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी सुपूर्त कल्या आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते पोपटराव साळुंके यांनी ही एक ॲम्बुलन्स दिली आहे. कराडमध्ये अनेक अम्बुलन्स आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे 108 क्रमांकांची ॲम्बुलन्स असते. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक हॉस्पिटल व्यवस्थापकांची अँब्युलन्स आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी रुग्ण सेवेसाठी  ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मंगळवार पेठेतील रुग्णाला पायी चालत जावे लागणे, हा मात्र गंभीर प्रश्न आहे. समाजातील जबाबदार समाजसेवक यांच्याशी संपर्क केला असता तर ॲम्बुलन्सचा प्रश्न उद्भवला नसता. अशी चर्चा सुरू आहे.


दरम्यान कराड नगरपालिकेच्या प्रशासनाने सर्वांशी संपर्क करून ॲम्बुलन्स उपलब्ध केली होती. मात्र सदर रुग्णाने "चला पायी जाऊ" म्हणून चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा व तालुका व प्रशासनाने एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून सक्षम अधिकारी नेमणूक करावा, त्यांच्या माध्यमातून तालुक्यात असणाऱ्या आवश्यक ॲम्बुलन्स अधिग्रहित करून त्यांचे योग्य पध्दतीने नियोजन करावे अशी मागणी होऊ लागली आहे.