एका दिवसात 25 रुग्ण...कराड 24, सातारा 1 तर कराड तालुक्यात एकूण 56 रुग्ण..जिल्ह्यात एकूण 69 रुग्ण... कराड तालुक्यात का वाढते रुग्णांची संख्या 


एका दिवसात 25 रुग्ण...कराड 24, सातारा 1 तर कराड तालुक्यात एकूण 56 रुग्ण..जिल्ह्यात एकूण 69 रुग्ण... कराड तालुक्यात का वाढते रुग्णांची संख्या 


कराड - कराड मधील कोविड बाधित म्हणून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील 14 अनुमानित कोविड बाधित असल्याचे आताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. रात्री उशिरा माहिती हाती आली आहे.


बघता-बघता कराड शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. कराड येथे शुक्रवारच्या दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा पाहता कराडची गंभीर परिस्थिती दिसून येत आहे. एका दिवसात सातारा जिल्ह्यामध्ये 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कराड शहरात एका दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 सातारात 1 रुग्ण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान सातारा जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा आता 69 झाला आहे सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला असून प्रशासनाचे कडक नियम व अटींचे पालन प्रतिबंधित कराड तालुक्यातील गावातबरोबरच कराड शहरालाही पालन करावे लागणार आहेत.कराड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची अचानक संख्या का व कशी वाढली ? याबाबत मात्र प्रशासनाने कसोशीने चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये "कोरोना"बाबत दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज आहे का ? याबाबत खुलासा करावा अशी मागणी होऊ लागली आहे.


वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी सर्व खबरदारी घेतल्या आहेत का ? कारण उपजिल्हा रुग्णालयातील सेवकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रुग्णसेवा करणाऱ्या सेवकांच्यावर कोरोना बाधीत होण्याचा प्रसंग ओढविल्यामुळे कराडकर नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. याबाबत प्रशासनाने जनजागृती करावी अशी मागणी होऊ लागली आहेत.


कोरोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने कराड नगरपालिकेने प्रारंभापासून अतिशय चांगले व सकारात्मक काम सुरू आहे. कराड शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रकार शिंदे यांनी याबाबत काय दक्षता घेतली ? दक्षता घेतली असेल तर मग मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या का वाढते आहे ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत तातडीने वैद्यकिय प्रशासन, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाने याबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.