रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336


रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 27 कोरोना बाधित...एकूण रुग्ण संख्या 336


कराड (राजसत्य) : रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यात पुन्हा 27 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आत्ता आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात 27 बाधित आहेत. त्यात काल वाई तालुक्यातील जांभळी गावच्या व्यक्तीचा मृत्यू पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेला आहे.


सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राप्त अहवालामध्ये सातारा जिल्ह्यातील खालील शहर व तालुक्यातील रुग्ण संख्या आहे. आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यात एकूण 336 रुग्णसंख्या झाली आहे.तर आत्तापर्यंत 122 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. दरम्यान 214 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत.


वाई : 17


सातारा : 7


कराड : 3