*मलकापूर ता. कराड येथील 47 वर्षीय बाधिताचा मृत्यु;* *230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*


*मलकापूर ता. कराड येथील 47 वर्षीय बाधिताचा मृत्यु;*


*230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*


 कराड : पनवेल येथून प्रवास करुन आलेला मलकापूर ता. कराड येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (मुळ गाव बाचोली ता. पाटण) येथील 47 वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने 21 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 *230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*  


 एन.सी.सी.एस. पुणे यांनी 191 तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 39 असे एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


*27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.


आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 281 रुग्णांवर उपचार सुरु असून 15 जणांचा मृत्यु झालेला आहे.