आज अजून काही नाही बर का...! 51 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


आज अजून काही नाही बर का...! 51 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 13 असे एकूण 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


गुरुवारी कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आल्याने सर्वत्र सन्नाटा होता. दरम्यान आज झालेल्या रिपोर्टमध्ये 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कराडकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आज अजून काही नाही बरं का.! म्हणत कराडकरांना आनंद होत आहे.