कराड येथील एक नागरिक बाधित तर 58 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह...283 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 

कराड येथील एक नागरिक बाधित तर 58 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह...283 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 


कराड : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.  


आता सातारा जिल्ह्यात 69 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 80 बाधित रुग्ण आढळले आहेत.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 4, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 21, कोरेगाव 3 असे एकूण 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 66, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे  75 व बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर नमुने 10 असे एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 90, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 26 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव 26 असे एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आले आहे,  अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.  


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image