"कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र


"कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले
कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र


कराड : गुरुवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहून सातारा जिल्हा अवाक झाला. दरम्यान शुक्रवारी सकाळी एक आनंदाची व आशादायक बातमी आलु आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांपैकी 6 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. असे खात्रीलायक वृत्त आहे.कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 6 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अजून 6 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12 रुग्ण कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी जातात. ही आशादायक आणि आनंदाची बाब निश्चितच आहे. कृष्णा चारिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले सातत्याने कोरोना बाधित व्यक्तींच्यावर उपचार करण्यासाठी सजग आहेत.


कोरोना महामारीचे संकट असले तरी, यावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रांमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स प्रशासन त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले योगदान देणारे कृष्णा हॉस्पिटलचे विश्वस्त कसोशीने प्रयत्न करीत आहेत. हे आशादायक चित्र आहे.सदरच्या महामारीतून मार्ग काढण्यासाठी सर्वस्तरावर सकारात्मक प्रयत्न केला जात आहे. यासाठी कृष्णा हॉस्पिटलचे प्रशासन सातत्याने दक्ष राहून कोरोना बाधित रुग्णांना अत्याधुनिक उपचार करून त्यांना ठणठणीत बरे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ही आनंद वार्ता आहे.


कोरोना महामारीच्या संकटकाळात सध्या सातारा जिल्ह्याची कशी परिस्थिती आहे. हे सदर आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. जिल्हय़ाची शहर - गाव निहाय आकडे : सातारा जिल्हा   114, कराड तालुका  86, कराड शहर  5, सातारा शहर  13, सातारा तालुका 1, वनवासमाची  37, मलकापुर  21, फलटण तालुका  5, कोरेगाव तालुका  1 तर कोरोनामुक्त  14 आणि कोरोनाचे बळी  2 


सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. विशेषता कराड तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ही चिंतेची बाब निश्चित आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही चांगली व सकारात्मक आहे.यामुळे महामारीचे संकट डोईवर असताना भितीदायक परिस्थितीमध्ये राहण्याचे कारण नाही. कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांवर सर्वतोपरी चांगले उपचार करण्यासाठी येथील वैद्यकीय सेवेतील सेवेकरी सज्ज आहेत.


गोरख तावरे