सह्याद्रि हॉस्पिटल येथून आणखी तीन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज, आठवड्यामध्ये एकूण २४ रुग्ण कोरोनमुक्त !


कराड मधील सर्व फिजिशियन व सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोनाविरुद्ध एकत्रित कंबर कसली !


सह्याद्रि हॉस्पिटल येथून आणखी तीन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज, आठवड्यामध्ये एकूण २४ रुग्ण कोरोनमुक्त !


कराड : सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून आज आणखी तीन कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून  गुरुवार दि.१४ मे  ते  बुधवार दि. २० मे या आठवड्यामध्ये एकूण २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना उपचार हे प्रामुख्याने एम. डी. मेडिसिन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. सातारा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कराड मधील २१ फिजीशियन्स एकत्र येऊन सह्याद्रि हॉस्पिटल येथील कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे करोनाविरुद्ध हा लढा अधिक व्यापक झाला असून कराड तालूक्यामध्ये याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. सलग सुरु असेल्या करोनामुक्त रुग्णांच्या डिस्चार्ज मुळे एक नवा आशेचा किरण निर्माण झाला असून, साकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे . 


        बुधवारी डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचे सर्व स्टाफ ने टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. त्यातील दोन ४८ वर्षीय महिला रुग्ण वनवसमाची येथील असून एक २० वर्षीय पुरुष रुग्ण हा मलकापूर येथील आहे. त्यांना २८ एप्रिल व १ मे रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  दि. १९ मे रोजी रुग्णांचे तपासणी अहवाल नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ आर जी काटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता देशमुख, सह्याद्रि हॉस्पिटलचे मुख्य फिजिशियन डॉ संदीप बानुगडे, सह्याद्रि हॉस्पिटलचे संचालक,मा.अमित चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटलचे कामकाज प्रमुख डॉ वेंकटेश मुळे व मार्केटिंग प्रमुख विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.


        सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे मुख्य फिजिशियन, डॉ संदीप बानुगडे म्हणाले, " उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ३१ कोरोना बाधित पेशन्ट हे सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले होते त्या पैकी चोवीस रुग्ण आजपर्यंत एका आठवड्यामध्ये कोरोनमुक्त झाले आहेत.  झपाट्याने वाढत असलेली कोरोनमुक्तांची संख्या हि समाधानकारक आहे व याचे श्रेय सह्याद्रि बरोबरच कराड मधील सर्व२१ फिजीशियन्सना देखील जाते. करोनाविरुद्ध लढा आपण सर्व मिळून एकत्रित पणे लढू आणि त्यावर मात करू याची आम्हाला खात्री आहे."