सर्वत्र क्षेत्रात वावर असणारे सुधीर एकांडे


सर्वत्र क्षेत्रात वावर असणारे सुधीर एकांडे


कराडच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल योगदान देतानाच राजकीय पटलावरील सर्व राजकीय नेत्यांशी नेहमीच सकारात्मक ऋणानुबंध निर्माण करणारे, आमचे मित्र सुधीर एखंडे यांनी वयाची एकसष्टी पूर्ण केली आहे. वास्तविक एकसष्ठीनिमित्त सुधीर एकांडे यांचा एक भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे इच्छा होती. दरम्यान कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनच्या काळात हा कार्यक्रम झाला नाही. सुधीर एकांडे हे हसतमुख, प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे, हातचे राखून न ठेवता समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही सदभावना जोपासणारे, मित्रांच्या मदतीच्या हाकेला प्रथम धावून येणारे, जात - वर्ण असा भेदभाव न करता दिलखुलासपणे मैत्रीला जपणारे, अनाहूतपणे एखाद्याला सल्ला दिला, तरी त्यामागची चांगली भावना काय आहे ? कशाकरता आपण हे सांगतो, बोलतो आहोत, याचे विवेचन करणारा आणि विशेष म्हणजे समाज जीवनात वावरताना प्रत्येक क्षेत्रात आपला गाडा अभ्यास आहे. याचे उदाहरणासह मतप्रदर्शन करणारा, सच्चादिल मित्र सुधीर एकांडे यांना 61 व्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!


सुधीर गोविंद एकांडे हे पूर्ण नाव असून एका सामान्य कुटुंबात जन्म झाला. उच्च शिक्षणापर्यंत पोचता आले नाही. याची मनी खंत न ठेवता, शिक्षणाचा आपला प्रवास दहावीपर्यंत झाला आहे. याची कबुली देताना कोणताही संकोच करीत नाहीत.शिक्षण अत्यंत गरजेचे आहे याची जाण व जाणीव असल्यामुळे सुधीर एकांडे यांनी मुलागा "ओंकार"ला उच्चविद्याविभूषित शिक्षण दिले आहे. 


आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब, सिक्कीमचे माजी राज्यपाल, विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेबरोबर सुधीर एकांडे यांचे सकारात्मक व राजकीय संबंध कायम राहीले. श्रीमंत छ.खा. उदयनराजे भोसले आ. विलासकाका पाटील - उंडाळकर, डाॅ.सुरेश भोसले व डॉ.अतुल भोसले, राजेंद्रसिह यादव यांच्याबरोबर राजकिय वावर सुधीर एकांडे यांचा राहिला आहे.अनेक राजकीय व्यक्तींची विचारधारा व मतभिन्नता असतानाही सुधीर एकांडे यांचा सर्वांशी विश्वासपूर्ण ऋणानुबंध आहे.ज्यावेळी ज्या राजकीय व्यक्तीकडे असेतील, त्यावेळी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रामाणिकपणे जे जे करता येईल ते सुधीर एकांडे यांनी केले आहे. सुधीर एकांडे यांच्या या राजकीय नातेसंबंधांमुळे त्यांच्यावर अनेक वेळेला टीका-टिप्पणी झाली. मात्र सुधीर एकांडे यांनी या टीकाटिप्पणीपेक्षा आपण जे काम केले ते मनापासून. मग टीकाटिप्पणीला त्यांनी महत्त्व जादा दिले नाही. हसतमुखाने झालेली टीका स्वीकारली. मात्र त्याचा खुलासा कधी केला नाही.


क्रीडा क्षेत्रात काम करण्याचे सुधीर एकांडे यांना लहानपणापासूनच आवड आहे. क्रीडा क्षेत्रात आपणाकडून भरीव कार्य व्हावे. यासाठी त्यांनी सातत्याने सकारात्मक प्रयत्न केला आणि याला यश आलेले आहे. एन.आय.एस.क्रिकेट कोच म्हणून केलेले काम अतुलनीय व गौरवास्पद आहे. इतकेच काय, जिल्हा क्रिकेट संघ, डेक्कन जिमखाना, पुणे. किर्लोस्कर, एकी इलेव्हन, कराड जिमखाना संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनबाबत बोलताना सुधीर एकांडे जुन्या आठवणींना नेहमी उजाळा देतात. आवर्जून जुन्या मित्रांचा नामोल्लेख करायला विसरत नाहीत. क्रिकेट हा सुधीर एकांडे यांचा आवडीचा विषय. क्रिकेटमुळेच सांधिकभावना सुधीर एकांडे यांच्यामध्ये निर्माण झाली. हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


ओंकार पिस्टन्स, राॅम्बस मल्टी-मेटल्स प्रा.लिच्या माध्यमातुन इंजि.व्यवसाय सुधीर एखंडे यांनी केला आहे. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काही नाविन्यपूर्ण करता येईल का ? याचा शोध तत्कालीन परिस्थितीत घेतला आहे. हा व्यवसाय करताना सुधीर एकांडे यांना कधीही शिक्षणाचा अडसर निर्माण झाला नाही. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने व प्राप्त परिस्थितीत समयसूचकता बाळगून, मधूर बोलण्यामुळे सुधीर एकांडे या व्यवसायात यशस्वी झाले. गोवा कपॅसिटर्स, पणजी.व वेस्टर्न हायव्होल्टस प्रा. लि जयसिंगपुर या कंपनीत संचालक म्हणून सुधीर एकांडे सध्या कार्यरत आहेत. आपण काय करायचे ? आपली दिशा काय असावी ? हे सुधीर एकांडे यांनी प्रथमता निश्चित केलेले असते आणि त्यानुसार त्यांची आत्तापर्यंत वाटचाल सुरू आहे. सामाजिक कार्य करताना व्यक्तिगत व्यवसायांचा व्याप सांभाळला पाहिजे. हे सुधीर एकांडे यांनी कृतीतून सिद्ध केले. सुधीर एकांडे यांच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना एक प्रश्न असतो की, सुधीर एकांडे नक्की करतात काय ? याचा खुलासा करून व्यक्त होण्यापेक्षा प्रत्येकाला कालांतराने समजेल. या विचारधारेने सुधीर एकांडे काम करीत असतात.


कराड जिमखाना ही कराड शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेली, लोकांच्या मनात आदरस्थान निर्माण केलेली संस्था. कराड जिमखान्यांना संस्थेचे सुधीर एकांडे संस्थापक सदस्य. कराड जिमखान्याची जी जबाबदारी सुधीर एकांडे यांच्यावर पडली. त्याचे संधीत रूपांतर करून कराड शहरात अनेक उपक्रम राबविले. कराड जिमखानामध्ये सुधीर एकांडे यांनी संचालक, असि.सेक्रेटरी,जन. सेक्रेटरी, उपाध्यक्ष व अध्यक्ष या पदांवर काम केले आहे. गेली पस्तिस वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. आजही सुधीर एकांडे कराड जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी म्हणून सक्रिय आहेत.


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कराड शाखेचे सुधीर एकांडे विद्यमान अध्यक्ष आहेत.अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, भुमि प्रतिष्ठान या संस्थांच्या सचिवपदी कार्यरत असून उपाध्यक्ष,सातारा जिल्हा क्रिकेट असो, सदस्य,कोचिंग कमिटी,एम.सी.ए. यामध्येही सुधीर एकांडे आजही सक्रियपणे कार्यरत आहेत. कराडमध्ये आत्तापर्यंत अति भव्यदिव्य असे जे उपक्रम राबवले गेले यामध्ये रणजी सामने,अ.भा.साहित्य संमेलन, अ.भा.पक्षीमित्र संमेलन,प्रीतिसंगम संगीत महोत्सव,राज्य मानांकन टे-टे स्पर्धा, पर्यावरण जनजागरण अभियान,कराड नगर परिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, अ.भा.बालकुमार साहित्य संमेलन, गीतरामायण, आदी उपक्रमांचे सचिवपद सुधीर एकांडे यांनी भूषवले. या उपक्रमांमांचे कार्यक्रम अत्यंत दर्जेदार झाले. हे निर्विवादपणे मान्य करावे लागेल.


गोरख तावरे


9326711721