पुन्हा एक वर्षे कराडकरांच्या सेवेसाठी यशवंत डांगे


पुन्हा एक वर्षे कराडकरांच्या सेवेसाठी यशवंत डांगे


कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.आज नगर विकास विभागाने राज्यातील अनेक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले.दरम्यान कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मुदतवाढ मिळाल्याने कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तत्कालीन नगरपालिकेचे मुख्याधिकारी वादग्रस्त ठरल्याने त्यांची बदली झाल्यानंतर यशवंत डांगे यांच्याकडे कराड नगरपालिकेचा पदभार देण्यात आला. माझ्या कार्यकाळात कराड शहराच्या विकास, आणि देशपातळीवर कराडचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची हमी पहिल्या भेटीत पत्रकारांशी बोलताना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली होती.


स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा पहिला क्रमांक आणण्यामध्ये मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कराड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी यशवंत डांगे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून गेल्या तीन वर्षांमध्ये यशवंत डांगे यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन विविध प्रकारची कामे केली आहेत. मुख्याधिकारी पदाबरोबर समन्वयक म्हणून यशवंत डांगे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराडचा लौकिक देशभर झाला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये समन्वय ठेवून लोकप्रतिनिधींमध्ये एक वाक्यता यावी असा प्रयत्न करून कराड नगरपालिकेचा कारभार हाकण्याची हातोडी यशवंत डांगे यांचे यांच्याकडे आहे.


केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेबरोबरच राज्य शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नगरपालिकेला गौरवण्यात आले आहे. कराड नगरपालिकेचे कर्मचारी व नागरिकांचा सहभागातून विविध उपक्रमांमध्ये असावा यासाठी विविध कल्पक कल्पना राबवून यशस्वी केले आहेत. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो. शासनाचा पगार घेतो. त्यापेक्षा अधिकचे काम केले पाहिजे. या धारणेतून यशवंत डांगे दिवसभराचे कामकाज करीत असतात.पहिल्या भेटीत पत्रकारांना दिलेले अभिवचन यशवंत डांगे यांनी गत तीन वर्षांमध्ये केले असून येणाऱ्या एक वर्षांमध्ये अधिक चांगल्या प्रकारेचे ते काम करतील असा संपूर्ण कराडकर यांना विश्वास आहे.


यशवंत डांगे मुख्याधिकारी म्हणून कराडला येण्यापूर्वी तीन मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे यशवंत डांगे यांचा कार्यकाळ कसा जाणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मीडियाच्या प्रतिनिधींनाही यशवंत डांगे कसे काम करणार ? याची उत्सुकता होती. दरम्यान "यशवंत डांगे है तो सब मुनकीन है" अशी कराड नगरपालिकेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी दिसून आली. प्रथमता यशवंत डांगे यांनी कराड नगरपालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन कामकाजास प्रारंभ केला. कराड नगरपालिकेमध्ये सत्ताधारी एका गटाचे. नगराध्यक्ष दुसऱ्या गटाच्या तर विरोधी पक्ष तिसऱ्या गटाची अशी राजकीय परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असावा. यासाठी यशवंत डांगे यांनी अनेक वेळेला समन्वयकाची भूमिका निभावली आहे. यावेळी यशवंत डांगे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले.


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कामकाज पद्धतीवर काळानुरूप अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कधी एक गट मुख्याधिकाऱ्यांच्या बाजूला तर बाकीचे विरोधात. अशी राजकीय परिस्थिती राहिली. दरम्यान सर्वांनाबरोबर घेऊन गावाचा विकास करणे, लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, राज्य शासन व केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियम व कायद्यानुसार कराड नगरपालिकेचा कारभार करणे,मुख्याधिकारी म्हणून असणाऱ्या अधिकारांचा सकारात्मक वापर करणे, याला यशवंत डांगे यांनी प्राधान्य दिल्याने काही प्रसंगी वादात अडकले. कराड नगरपालिकेचे कर्मचारी, कराडकर नागरिकांच्या दृष्टीने यशवंत डांगे हे नेहमी "हिरो"च राहिले. प्रशासकीय पातळीवर यशवंत डांगे यांचा वरचष्मा आहे. हे एक वर्षाच्या मुदत वाढीच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.


मुदत वाढीनंतर यशवंत डांगे यांच्या कामकाजाबाबत काही त्रुटी असतील. मात्र ते कराडकरांची सेवा प्रामाणिक करतात. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. "मी पगार घेतो, त्यापेक्षा अधिक काम केले पाहिजे" ही यशवंत डांगे यांची भावना नक्कीच प्रामाणिक मुख्याधिकाऱ्याची आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नोकरी करताना सर्व शक्यता गृहीत धरून यशवंत डांगे यांची काम करण्याची पद्धत रास्त व बरोबरच आहे. असे म्हणावे लागेल.तत्कालीन परिस्थितीत यापूर्वी गेलेले मुख्याधिकारी हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यान कार्यकाळापेक्षाही अधिक एक वर्षाची मुदतवाढ मिळवून यशवंत डांगे यांनी काम करणाऱ्यांना सर्वजण स्वीकारतात हा संदेश दिला आहे. यशवंत डांगे कराडला मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर आम्ही माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पुन्हा एकदा मुदतवाढीसाठी शुभेच्छा.