नगरपरिषद सेवकांची आदरणीय पी.डी. पाटील सह. पतसंस्थेच्यावतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द


नगरपरिषद सेवकांची आदरणीय पी.डी. पाटील सह. पतसंस्थेच्यावतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द


कराड : कराड नगरपरिषद सेवकांची आदरणीय पी.डी. पाटील सहकारी पतसंस्था मर्या. यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आला.


महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाचा (कोवीड-19 ) प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेने त्याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असलेने सामाजिक बांधिलकीची जपणूक करत कराड नगर परिषद सेवकांची आदरणीय टी डी पाटील सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम रुपये 11,111/- चा धनादेश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


कराड नगरपालिकेच्या सेवकांची आदरणीय पी डी पाटील सहकारी पतसंस्था ही कार्यरत असून या माध्यमातून सामाजिक भान ठेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केलेनुसार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देण्यात आला.


यावेळी ज्येष्ठ संचालक अभियंता रफीक भालदार,सभापती रमेश रेनाक,उपसभापती नंदकुमार संदे,विक्रम जाधव,सुभाष पवार, विठ्ठल नांदे,सुनील बसर्गी,सचिव राजेंद्र ढेरे,अल्ताफ मंगलेकर, जगन्नाथ शिंदे उपस्थित होते.