कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांचा परिचय


नाव : श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील


जन्म : 29 जुलै, 1961


जन्म ठिकाण : कराड, जिल्हा सातारा


शिक्षण : एफ. वाय. बी. ए.


ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी.


वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती जयमाला.


अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा)


व्यवसाय : शेती व सामाजिक कार्य 
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


मतदारसंघ : 259- कराड(उत्तर), जिल्हा सातारा 
इतर माहिती : 2008 पासून अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था, यशवंतनगर; 2002 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन संस्था, कराड; 1994 पासून गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, शिक्षण मंडळ; 2005 पासून कार्यकारी विश्वस्त, वेणुताई चव्हाण चरिटेबल पब्लिक ट्रस्ट, कराड, 2013 पासून अध्यक्ष, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, कराड, 2014 पासून अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, कराड; 1992 पासून संचालक व 1996 पासून चेअरमन, सह्याद्री सहकारी साखर लि., यशवंतनगर; या कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाकडून 1998-99 चा केन डेव्हलमेंट द्वितीय क्रमांक अॅवार्ड; 2011-12 उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम पुरस्कार; 2012-12 चा तिसरा तसेच केन डेव्हलमेंटचा तृतीय पुरस्कार मिळविला; 1994-96 चेअरमन, सह्याद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक संस्था; अध्यक्ष, पी. डी. पाटील सहकारी बँक लि., कराड; चेअरमन, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्था, कराड, चेअरमन, कृष्णाई सहकारी दुध उत्पादक संस्था, कराड, 2010 पासून संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली; डिसेंबर 2003 पासून उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई, 1992-99 काँग्रेस पक्षाचे कार्य, 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे कार्य 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 2012-14 समिती प्रमुख अंदाज समिती; आक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.


 


Popular posts
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image