मलकापूर नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटीची गरज.....नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सहमत

मलकापूर नगरपरिषद नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 5 कोटीची गरज.....नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सहम


कराड (राजसत्य) - मलकापूर नगरपरिषदेने राज्यामध्ये विविध नाविण्यपुर्ण योजना राबवुन इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचेसमोर एक आदर्श व नावलौकिक मिळविला आहे. शहरातील नागरीकांना नागरी सुविधाबरोबरच प्रशासकीय कामकाजा दरम्यान उत्कृष्ठ सेवा मिळावी याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतले असुन सदरचे काम प्रगतीपथावर आहे, या कामाचे अंदाजपत्रक विचारात घेता आवश्यक असणाऱ्या 5.00 कोटी निधीची मागणी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आले आहे.


यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे उपस्थित होते. सध्या मलकापूर नगरपरिषदेचे प्रशासकीय कामकाज यशवंत हौसिंग सोसायटी येथील मुख्यकार्यालयामध्ये प्रशासन विभाग, कर विभाग, जन्ममृत्यू विभाग लक्ष्मीनगर येथील बहुउद्देशीय इमारतीमध्ये लेखा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, आस्थापना विभाग, विद्युत विभाग व आगाशिवनगर पाणीपुरवठा विभाग, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी येथे वाचनालय व महिला बालकल्याण विभाग इ. ठिकाणावरुन सुरु आहे. सदरचे प्रशासकीय कामकाज एकाच इमारतीमध्ये व्हावे व नागरिकांना एकत्रितरित्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरीता नगरपरिषदेने नवीन प्रशासकीय इमारतीचे काम हाती घेतले आहे. सदर प्रशासकीय इमारत ही नवी मुंबई महानगरपालिकेचे इमारतीची प्रतिकृती असलेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही इमारत शोभनीय आहे. 


या इमारतीकरीता तत्कालीन मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 7 कोटीचा निधी मंजूर केला होता. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणेत आली. इमारतीमधील बैठक व्यवस्था, विद्युतव्यवस्था व सुशोभिकरण याकरीता निधीची आवश्यकता असलेचे निदर्शनास आणुन देणेत आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करुन देणेस सहमती दर्शविली आहे