टी.ए.व्ही.आय हृदय शस्त्रक्रिया कलावती माळी यांच्यावर यशस्वी - डॉ.विजयसिंह पाटील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुसरी तर महाराष्ट्रामध्ये चौथी शस्त्रक्रिया 

टी.ए.व्ही.आय हृदय शस्त्रक्रिया कलावती माळी यांच्यावर यशस्वी - डॉ.विजयसिंह पाटील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुसरी तर महाराष्ट्रामध्ये चौथी शस्त्रक्रिया


  कराड - ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी 'ट्रान्सकेथेटर एऑर्टीक व्हॉल्व इंग्लांटेशन' (टी.ए.व्ही.आय) हृदय शस्त्रक्रिया कलावती माळी (वय ७०, रा.मायणी, जि.सातारा) यांच्यावर सातारा जिल्हयामध्ये प्रथमच यशस्वी झाली असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुसरी तर महाराष्ट्रामध्ये चौथी शस्त्रक्रिया असल्याची माहिती हृदयरोग तज्ञ डॉ.विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.


हृदयरोग तज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांचे यशाबद्दल कृष्णा हॉस्पीटलचे कुलपती डॉ.सुरेश भोसले, माजी राज्य मंत्री डॉ.अतुल भोसले यांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार डॉ. दिलीप सोलंकी यांनी मानले. 


रुग्ण श्रीमती कलावती माळी म्हणाल्या, डॉ.विजयसिंह पाटील यांनी मला व माझ्या नातेवाईकांना या शस्त्रक्रियेबाबत आवश्यक व सविस्तर माहिती दिल्यानंतर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. आज अत्यंत आनंद होतो की, मला नवीन जीवन मिळाले असून मी आज ठणठणीत बरी झाली, व  माझी सर्व दैनंदिन कामे मी स्वतः करीत आहे. अत्यंत अवघड व गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया प्रथमतः एवॉर्टीक व्हाल्व इम्लाटेशन हदयशस्त्रक्रिया सातारा जिल्ह्यामध्ये झाली असल्याचे सांगून म्हणाले, आज आपण स्पप्नवत आयुष्य जगत आहोत. दहा वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत क्लिस्ट व अशक्यप्राय मानल्या जाणाऱ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज शक्य होताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक फायदा वैद्यकिय क्षेत्राला झालेला असून अनेक असाध्य रोग व अवघड शस्त्रक्रिया सहज व सुलभपणे बरे केले जात असल्याची माहितीही डॉ. विजयसिंह पाटील यांनी दिली. 


डॉ.विजयसिंह पाटील म्हणाले, मायणी येथील कलावती माळी ७० वर्षे वयाच्या हृदयरुग्ण महिला ज्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांचे वजनही कमी होते. गेली १० वर्षे त्यांना जोराची धाप लागणे, चक्कर येणे त्रास होता. रक्ताचा प्रवाह नियंत्रित करणारी झडप निकामी (एऑर्टीक व्हॉल्व स्टेनॉसीस) झाल्याचे लक्षात येताच  झडप बदलणे आवश्यक असून श्रीमती माळी यांचे वय व त्यांची शारीरीक क्षमता विचारात घेता ओपन हार्ट सर्जरीने झडप बदलणे अवघड व जोखमीचे होते. ट्रान्सकेथेटर एऑर्टीक व्हॉल्च इम्पालटेंशन (TAVI) या शस्त्रक्रियेव्दारे झडप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेमध्ये जांघेमध्ये एक छोटासा छेद घेवून कॅथेटरच्या सहाय्याने एक कृत्रिम झडप (व्हॉल्व) रक्तवाहिनीमधून हृदयापर्यंत पोहचवून जीर्ण व निकामी झालेल्या झडपेवरती बसवली जाते व झडपेचे कार्य सुरु होताच कॅथेटर बाहेर घेतला जातो. 


डॉ.विजयसिंह पाटील म्हणाले, जे रुग्ण वृध्द आहेत ज्यांना मुत्रपिंडाचा, फुफ्फुसाचा किंवा मधुमेहाचा त्रास आहे. ज्या रुग्णांमध्ये पूर्वी व्हाल्व बदलण्याची शस्त्रक्रिया झाली आहे, परंतु कृत्रिम व्हॉल्व योग्यरित्या कार्य करीत नाहीत अशा रुग्णांमध्ये 'टी ए व्ही आय' या शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. छाती उघडली जात नसलेने रुग्णास सामान्य भुल देणे गरजेचे नसते. शस्त्रक्रियेनंतर कोणताही मोठा व्रण राहत नाही. रुग्ण अगदी ४-५ दिवसात डिस्चार्ज घेवून घरी जावू शकतो. व शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे व काही खबरदारीचे उपाय घेतल्यास रुग्ण सामान्य व आनंदी जीवन जगू शकतो असेही यावेळी सांगितले.