राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्थेला मान्यता - धनंजय कदम

कराड (राजसत्य) - क्रेडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय संघटना असून, 55 शहरांमध्ये विस्तार असून 2650 बांधकाम व्यावसायिक सभासद आहेत. क्रेडाई महाराष्ट्र ही संस्था राज्यभर कायदेशीर बांधकामे करणेवर भर देत असून शासनासोबत लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात नेहमीच पुढाकार घेत असते. नुकतेच महारेराने क्रेडाई महाराष्ट्रला राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्था म्हणून मान्यता दिल्याची माहिती क्रेडाई कराडचे अध्यक्ष धनंजय कदम यांनी दिली. 


राज्यातील सर्व प्रचलित व नविन बांधकाम प्रकल्पांना महारेराकडे नोंद करतेवेळी स्वयंनियामक संस्थांची निवड करणे अनिवार्य केले आहे. यामुळे बांधकाम व्यवसायीकांच्यामध्ये अधिक व्यवसायीकता, पारदर्शकता, शिस्त व एकसूत्रीपणा येवून पर्यायाने फसवणुकीला आळा बसणेस मदत होईल असे महारेराचे मत आहे. स्वयंनियामक संस्था म्हणून, क्रेडाई महाराष्ट् संघटनेने सभासदांना महारेरा कायदा, नियम व नियमावली, परिपत्रक, आदेश इत्यादींचे पालन करणेसाठी प्रोत्साहित करणेचे आहे. यापुढे प्रचलित व नविन सुरु होणा-या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी सभासदांना चार पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये क्रेडाई हा एक पर्याय आहे. असेही धनंजय कदम यांनी सांगितले.


महारेराच्या निकषानुसार सभासदांच्या किमान 500 प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी व कायदेशीर अशी बांधकाम व्यवसायीकांची संघटना असणे या दोन्ही बाबीची पुर्तता करुन हि मान्यता घेतली आहे. 55 शहरामध्ये एक नवीन सभासदत्व योजना सुरु केली असून कोणत्याही संस्थेचे सभासदत्व नसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पनोंदणीसाठी खास ''रेरा प्रोजेक्ट मेम्बरशिप'' चे शुल्क घेवुन केली जाणार आहे, त्याचा लाभ प्रकल्प धारकांनी घ्यावा असे आवाहन केले असून धनंजय अधिकराव कदम (9422405988),मकरंद जाखलेकर (9403771730) यांच्याशी संपर्क साधावा.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image