तात्काळ निर्णय घेण्याच्या पद्धतीमुळे खा. श्रीनिवास पाटील यांची लोकप्रियता वाढली


कराड (गोरख तावरे) - महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. प्रत्येक खासदारांचे काम करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कामामुळे नेहमीच मतदारसंघात चर्चा सुरू असते. लोकसभेचा लोकप्रतिनिधी कसा असावा ? याबाबत नेहमीच "श्रीनिवास पाटील यांचा सारखाच लोकसभेचा खासदार असावा" ! अशी सोशल मीडियावर सातत्याने चर्चा सुरू असते.खासदार श्रीनिवास पाटील यांना "रयतेचे राजे" म्हणून संबोधले जात आहे.


कराड तालुक्यातील सुपणे गावातील छ. शिवाजी महाराज कुस्ती केंद्र आहे. ग्रामीण भागातून पैलवान तयार व्हावेत यासाठी या कुस्ती केंद्रातून प्रशिक्षण दिले जात आहे. मातीतील कुस्तीबरोबर मॅटवरील कुस्ती अलीकडच्या काळामध्ये खेळली जात आहे. यासाठी मॅटची आवश्यकता असते. छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती केंद्राचे प्रमुख प्रशिक्षक पै. प्रशांत पाटील, पै. सतीश चव्हाण, पै. भागोजी कांबळे, पै. निखिल आणि सुजित यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन सदर कुस्ती केंद्रासाठी मॅटची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले.सदरची मागणी करतात खासदार श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ त्यांना कुस्तीसाठी मॅट उपलब्ध करून दिले.


सुपने गावातील पैलवान केवळ खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे कुस्ती केंद्रांमध्ये मॅट नाही, ही गोष्ट सांगण्यासाठी गेले असता खासदार श्रीनिवास पाटील यांनी गेलेल्या पैलवानांना धक्कादायक निर्णय दिला. ग्रामीण भागातील जनतेला काय हवे, हे तात्काळ देण्याची कार्यपद्धती खासदार श्रीनिवास पाटील यांची असल्यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. जखिणवाडी येथे कराड तालुक्यातील क्रीडा संकुल अपुऱ्या अवस्थेत पडले आहे. यामुळे या क्रीडा संकुलाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. सुपने येथील पैलवान यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे सुपने गावांमध्ये अध्यावत क्रीडासंकुल व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. याची दखल घेऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांची सदर पैलवानांची भेट घडवून आणून सदर कामाबाबत सूचना केल्या आहेत.