सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर


कराड (राजसत्य) - मलकापूर (ता. कराड) येथील सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर मलकापूर भाजी मंडई लगतच्या नव्या वास्तूत उत्साहात करण्यात आले. आप्पासाहेबांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुलबाबा भोसले, विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


पैलवान धनाजी पाटील, डॉ. सारिका गावडे, आबा गावडे, संजय पवार, रवी जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, स्व. जयवंतराव भोसल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी जाधव, संचालक हणमंत जाधव, भास्कर साळुंखे, जयवंत माने, हरिश्‍चंद्र पाटील, वासुुदेव फाळके, वसीम मुल्ला, श्रीमती सुनीता पाटील, श्रीमती लता चव्हाण, धनाजी भोसले, राजेंद्र थोरात, मुख्य व्यस्थापक अरूण यादव, समाधान चव्हाण उपस्थित होते