शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध...,..... कराड शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर


कराड (राजसत्य) - सीमावासीय मराठी बांधवांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाज उठून सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याचे मत व्यक्त केले होते. कर्नाटक सरकारच्या चिथावणीने तथाकथित कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड वेदिका संघटनेच्या काही विकृत प्रवृत्तीने मराठी सीमावासिय बांधवांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. अशा विकृत प्रवृत्ती विरोधात शिवसेनेच्यावतीने कराड येथील दत्त चौकात निदर्शने करुन निषेध करण्यात आला.


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्ष रेंगाळत पडला आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी नेहमीच शिवसेना राहिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असून मराठी सीमा बांधवांच्या विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते विकृतपणे वक्तव्य व कृती करीत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.कर्नाटक सरकारचा निषेध करणारे निवेदन शिवसेनेच्यावतीने कराड शहर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे


उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक,कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे,कराड उत्तर तालुकाप्रमुख किरण भोसले, सुनील पाटील,कराड शहर प्रमुख शशिराज करपे, मलकापूर शहरप्रमुख मधूकर शेलार,मलकापूर उपशहर प्रमुख सूर्यकांत मानकर, उपतालुका संजय चव्हाण, काकासो जाधव, प्रमोद वेर्णेकर, राजेंद्र माने, अजित पुरोहित, अण्णासो रेंदाळकर, अशोक साळवे, अमोल कांबळे, ज्योतीराम साळी, महेश कोळी, शेखर बर्गे, कुलदीप जाधव,दिलीप यादव, विजय तिवारी, संभाजी जगताप, प्रवीण लोहार, ओंकार काशीद, विक्रम गंधे साजिद मुजावर, व शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image