जिल्हा वार्षिक नियोजनचा 2020-21 चा आराखडा मंजूर 2019-20.....च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता.....विकास कामे वेळेत पूर्ण करा; मार्च अखेर निधी खर्च करा........पालकमंत्री बाळासाहेब पाटील


सातारा - (जि.मा.का.) : चालू आर्थिक वर्षात विविध कारणांमुळे जिल्हा वार्षिक योजनांचा निधी कमी प्रमाणात खर्च झाला आहे. जिल्ह्याची विकासकामे वेळेत करुन हा निधी मार्चपूर्वी खर्च करण्यासाठी प्रशासनासह सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.


जिल्हा नियोजन समितीची सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजनांची प्रारुप आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात राज्याचे सहकार,पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खा. श्रीनिवास पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विधान परिषद आमदार सर्वश्री मोहनराव कदम, आनंदराव पाटील, आमदार सर्वश्री मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे आदी उपस्थित होते.


प्रारंभी जिल्हा नियोजन समिती मागील बैठकीतील इतिवृत्त व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनु. जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाहय उपयोजना) सन २०१९-२० अंतर्गत ३१ डिसेंबर २०१९ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देण्यात आली. सदर पुनर्विनियोजन प्रस्तावामध्ये सर्वसाधारण योजनेखालील रु. ८३४.६४ लक्ष अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाखालील रु. ६९०.४४ लक्ष व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राखालील रु. १५८.२१ लक्ष मार्च २०२० अखेर खर्च होऊ न शकणारी संबंधित योजनांवरील तरतूद इतर योजनांकडे वळवण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा२ वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाबाहयक्षेत्र) सन २०२०-२१ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या रु. २६४.४९ कोटी रकमेच्या मर्यादेव्यतिरिक्त रु. ६०.५१ कोटीच्या वाढीव मागणीसह एकूण रु. ३२५.०० कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेच्या रु. ७९.८३ कोटी व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राच्या रु. १.५८ कोटीच्या सन २०२०-२१ च्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी आयत्या वेळच्या विषयांना मान्यता खालीलप्रमाणे देण्यात आली.


सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान, नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, अग्निशमन व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण, गिरीस्थाननगरपरिषदांना पर्यटनासाठी विशेष अनुदान व लोकशाहीरअण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा योजना या योजनांतर्गतच्या सन २०१९-२० च्या मूळ मान्य आराखड्याबाहेरील सोबतच्या यादीतील कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन यांनी सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.


लोणंद येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळे तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मौजे खेड बु. ता.खंडाळा येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता आवश्यक असल्याने प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.सातारा यांचेकडून सादर करण्यात आला. त्यास मान्यता देण्यात आली.


रहिमतपूर नगर परिषदेने सन 2009-10 मध्ये विविध सार्वजनिक उपयोगी दोन मजली भव्य इमारतीचे बांधकाम केलेले आहे. सदर इमारतीत नगरपरिषदे मार्फत वाचनालय ग्रंथालय सुरू करण्याबाबत व ग्रंथालयातील पुस्तके सुस्थितीत ठेवणे, वाचकासाठी बैठक व्यवस्था व इतर अनुषंगिक कामे यासाठी फर्निचर करणे आवश्यक आहे. सदर कामास अंदाजे रक्कम रू.67.00 लक्ष इतका खर्च येणार आहे. या कामास जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2019-20 मधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणेबाबत अध्यक्ष, नगर परिषद रहिमतपूर यांनी प्रस्ताव सादर केला.त्यास मान्यता देण्यात आली.


गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व कार्यकारी अभियंता, सार्व. बांध. विभाग (पश्चिम) सातारा यांनी डोंगराळ भागामध्ये साकव बांधण्यासाठी विशेष कार्यक्रम या योजनेतील सन 2019-20 च्या मंजूर आराखड्यातील मौजे कुठरे येथील वांग नदीवर साकव बांधणे. ता.पाटण (रक्कम रू.३५.०० लक्ष) ऐवजी मौजे दिवशी बु.ते बोंद्रेवाडी रस्त्यावर साकव बांधणे. ता.पाटण (रक्कम रू.३४.२९ लक्ष) आणि मौजे करपेवाडी (काळगांव) येथील ओढ्यावर साकव बांधणे. ता.पाटण (रक्कम रू.३४.०० लक्ष) ऐवजी मौजे चाळकेवाडीयेथील भैरवनाथ मंदिराजवळ साकव बांधणे. ता.पाटण (रक्कम रू.३४.७० लक्ष) या कामांचा काम बदल प्रस्ताव प्राप्त झाला. त्यास मान्यता देण्यात आली.


जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी व्यायामशाळांचा विकास या योजनेतील मूळ मंजूर आराखड्या बाहेरील लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या अंजुमन खैरूल इस्लाम उर्दु हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, महाबळेश्वर, ता.महाबळेश्वर, सैनिक स्कूल सातारा, ग्रामपंचायत नागेवाडी, ता.सातारा, ग्रामपंचायत वालुथ, ता.जावली, ग्रामपंचायत नायगांव, ता.खंडाळा, नव महाराष्ट्र विद्यालय व ज्युनि.कॉलेज बिदाल, ता.माण, ग्रामपंचायत पेठ-शिवापूर, ता.पाटण, ग्रामपंचायत खराडे, ता.कराड व ग्रामपंचायत आटके, ता.कराड या व्यायामशाळा साहित्यच्या रु. ४२.०० लक्षच्या ९ कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.


जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गतच्या व्यायामशाळा विकास अनुदान अंतर्गतच्या मूळ आराखड्या बाहेरील रु. ४५.०० लक्षच्या ९ कामांना जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेस्तव प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.


जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गतच्यासाकव बांधकाम या योजनेंतर्गतच्या मूळ मंजूर आराखडा बाहेरीलता. पाटण मधील वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रस्तावित केलेल्या १२ कामांना व आमदार मकरंद पाटील यांनी प्रस्तावित केलेल्या ४ अशा एकूण १६ कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग यांनी सादर केला.त्यास मान्यता देण्यात आली.


जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गतच्या क्रीडांगण विकास अनुदान अंतर्गतच्या मूळ आराखड्या बाहेरील रु. ३१.५० लक्षच्या सोबतच्या यादीतील ७ कामांना जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेस्तव प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी सादर केला. त्यास मान्यता देण्यात आली.


जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गतच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई,यांनी पाटण तालुक्यात प्रस्तावित केलेली १० अभ्यासिका, आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण व कोरेगाव तालुक्यातील प्रस्तावित केलेली ११ अभ्यासिका, आमदार जयकुमार गोरे यांनी प्रस्तावित केलेली मौजे तौंडले ता.माण येथील १ अभ्यासिकाआणि बाळासाहेब खंदारे,जि.नि.स. सदस्य यांनी प्रस्तावित केलेली २० सीटचे शौचालय बांधणे या विकास कामांना जिल्हा नियोजन समितीची मान्यता देण्यात आली.