सहकार पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा 24 ते 28 जानेवारी दरम्यान चा सविस्तर दौरा


सहकार पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा 24 ते 28 जानेवारी दरम्यान चा सविस्तर दौरा 
 
कराड (गोरख तावरे) राज्याचे सहकार, पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून 24 जानेवारी ते 28 जानेवारी अखेर त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.....शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता 260 मंगळवार पेठ, निवास्थान कराड येथून साताराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आगमन व बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वाजता सातारा येथून कापेर्डे ह./मसूर ता. कराडकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता कोपर्डे ह./मसूर विभाग येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थिती व सोईनुसार 260 मंगळवार पेठ, कराड निवासीस्थानी  आगमन व राखीव.


 शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम रथपूजन यात्रा शुभारंभ, सकाळी 2 वाजता शेतकरी मेळावा स्थळ:अरण्यामंगल कार्यालय, उंब्रज व तळबीड गट. दुपारी 3 वाजता उंब्रज येथून साताऱ्याकडे प्रयाण.  सायं 4 वाजता सातारा येथे आगमन व झी 24 तास शौर्य सन्मान कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रागृह सातारा येथे आगमन व राखीव. मुक्काम सातारा.


रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथून छत्रपती शाहू क्रीडा संकुलकडे प्रयाण. 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापनदिन राष्ट्रध्वजारोहणाच्या समारंभास उपस्थिती. 10 वाजता शिवभोजन योजनेचा शुभारंभ. स्थळ: एसटी स्टॅन्ड, सातारा. 10.30 वाजता एस.टी स्टॅन्ड सातारा येथून शासकीय विश्रामगृह, साताराकडे प्रयाण. 10.40 वाजता विश्रामगृह येथे आगमन व राखीव व सोईनुसार 260 मंगळवार पेठ, कराड येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सायं.5 वाजता शेतकरी सभासद मेळावा. स्थळ : वाठार (कि) ता. कोरेगाव.  सोईनुसार पुण्याकडे रवाना.


सोमवार दि.27 सायं 4.30 वा. 260, मंगळवार पेठ, कराड येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सोईनुसार मतदारसंघातील लोकांच्या भेटीस राखीव. मुक्काम कराड


मंगळवार दि.28 जानेवारी रोजी सोईनुसार सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात राखीव. रात्री 10.45 वाजता 260 मंगळवार पेठ, कराड येथून रेल्वे स्टेशन कराडकडे प्रयाण व महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.