संभाजी महाराज यांचे कार्य आदर्शवत - उपअधीक्षक सुरज गुरव किल्ले सदाशिवगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन


संभाजी महाराज यांचे कार्य आदर्शवत - उपअधीक्षक सुरज गुरव ..........किल्ले सदाशिवगड येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन


कराड - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व आदर्शावर वाटचाल करत छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. त्यांचे विचार आणि कार्य आजही दिशादर्शक आहेत, असे गौरवोद्गार कराडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी काढले आहेत.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले सदाशिवगड येथे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कराड नगरपालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. सुभाष एरम, रश्मी एरम, सर्जेराव पाटील, शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे रणजित शिंदे, ब्रिजेश रावळ, मुकूंद पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, सचिव आबासाहेब लोकरे, राहुल जाधव, पकंज पांढरपट्टे, सुमित पळसे, संदीप मुळीक, अभिजीत क्षीरसागर, चंद्रजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


नगरपालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यापासून युवा पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले तर स्वराज्य, रयतेच्या हितासाठी बलिदान कसे द्यावे ? हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले सांगत छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.


यावेळी डॉ. सुभाष एरम यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत युवा पिढीने गडसंवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच गडसंवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही डॉ. सुभाष एरम यांनी यावेळी दिली.


यावेळी अजय घोरपडे, मसूर मुळीक, योगेश भोसले यंाच्यासह गडप्रेमी नागरिक उपस्थित होते. सचिव आबासाहेब लोकरे यांनी उपस्थितांचे स्वगात केले.